'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय कौटुंबिक मालिकांपैकी एक. कोल्हापुरच्या शिर्के-पाटलांच्या घराची ही कहणी आहे. जयदीप आणि गौरीचा संसार आता हळूहळू फुलू लागला आहे. दोघंही एकमेकांच्या सोबतीने कुंटुंबाला एकत्र बांधून ठेवतायत. खरंतर गौरीचं जयदीपवर प्रचंड प्रेम असलं तरी जयदीप हा पूर्वी ज्योतिकाच्या प्रेमात होता. त्याचं आणि गौरीचं अपघातानेच लग्न झालं . पण हळूहळू गौरीने आपल्या प्रेमाने जयदीपचं आणि कुटुंबाचं मनं जिंकून घेतलं. त्यावेळेस ज्योतिका रागाच्या भरात परदेशात निघून गेली होती. ती आता पुन्हा परतली आहे.
पण आता ज्योतिकाच्या भूमिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. आता जयदीपची मैत्रिण ज्योतिका हे पात्र अभिनेत्री केतकी पालव साकारणार आहे.
ज्योतिकाच्या येण्याने शालिनीने पुन्हा एकदा डाव साधलाय. गौरी आणि जयदीपमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न तिने सुरु केले आहेत. पण गौोरीने शालिनीला सडेतोड उत्तर दिलं आहे, तेव्हा पहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं'.