By  
on  

अंधश्रद्धेवर आधारित आहे सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीज 'परीस'

अंधश्रद्धेवर आधारित 'परीस' ही सस्पेन्स थ्रीलर असलेली वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर 31 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतातील बराचसा प्रदेश ग्रामीण असून या भागात आजही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा दिसून येते. अशा या सामाजिक, ज्वलंत आणि महत्वाच्या विषयावर सिरीज आधारित आहे. या वेबसीरिजचे संवाद, पटकथा आणि दिग्दर्शन मयूर करंबळकर, कुलदीप दंगाडे आणि विशाल सांगले यांनी केले आहे. 'प्लॅनेट मराठी' आणि 'वन कॅम प्रॅाडक्शन' प्रस्तुत 'परीस' या वेबसीरिजची कथा मयूर करंबळकर यांची आहे.

नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

सोन्याच्या लोभापोटी गावातील काही लोक परीसाच्या शोधात निघतात. त्यांचा हा शोध त्यांना कुठपर्यंत घेऊन जातो? त्यांना परीस मिळवण्यात यश येतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना 31 ऑगस्ट रोजी आपल्याला मिळणार आहेत. या वेबसीरिजचे छायाचित्रण सोपान पुरंदरे यांनी केले आहे. 

अविनाश खेडेकर, चंद्रकांत राऊत, गायत्री बनसोडे, पायल जाधव, कुलदीप दगडे, अश्विनी अनेगिरीकर, विशाल सांगळे आणि कुणाल पुणेकर ही कलाकार मंडळी या सिरीजमध्ये झळकणार आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive