By  
on  

गोव्याच्या किना-यावर फेम अभिनेता झाला बाबा, म्हणतो 'मुलगी झाली हो'

अनेक कलाकारांकडून सध्या गोड बातमी मिळतेय. सोशल मिडीयावर सर्वजण ते आनंदाने चाहत्यांसोबत शेअर करतायत. गोव्याच्या किना-यावर या प्रसिध्द व्हिडीओ सॉंगमधून प्रेक्षकांचा लाडका बनलेला अभिनेता स्रुहद व-हाडकर याने नुकतंच आपण बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.  

२९ जानेवारी २०२० रोजी सुहृद वर्डेकर हा प्राची खडतकर हिच्यासोबत विवाहबद्ध झाला होता. कालच त्याने सोशल मीडियावरून आपण एका मुलीचा बाप झालो असल्याचे चाहत्यांना कळवले आहे. त्याच्या या गोड बातमीवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

 

एक घर मंतरलेलं या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची आडरकर यांच्यासोबत त्याला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. गोव्याच्या किनाऱ्यावर…. ह्या गाण्याला युट्युबवर अनेक हिट मिळाले आहेत. या गाण्यामुळे सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांना तुफान प्रसिद्धी मिळाली होती. ह्या गाण्याचे दिग्दर्शन देखील सुहृदनेच केले होते.

गोव्याच्या किनाऱ्यावर या गाण्याच्या हिट नंतर सुहृद आणि सिद्धी पाटणे यांनी अनेक व्हिडीओ सॉंग एकत्रित साकारले होते.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive