By  
on  

वाढदिवसाला हेमांगी कवीने शेयर केला हा फोटो, म्हणते "आंटी म्हटल्यावर न चिडण्याचं वय झालंय"

सोशल मिडीयाचा वापर विविध पद्धतिने केला जातो. काही जण त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करतात तर काही आपले मुद्दे आणि विचार सडेतोड आणि बिनधास्त मांडण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करतात. अभिनेत्री हेमांगी कवी देखील सोशल मिडीयावर विविध कारणांनी चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती शेयर करतेच. मात्र तिचे वाचरही ती बिनधास्तपणे मांडते. यासाठी सोशल मिडीयावर हेमांगीचा मोठा चाहतावर्ग आहे. याच चाहत्यांसाठी हेमांगीने आणखी एक पोस्ट केली आहे. निमित्त आहे तिच्या वाढदिवसाचं.

हेमांगीने तिच्या वाढदिवसाला खास फोटो शेयर करत एक पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केलीय. या पोस्टमधून ती 41 वर्षांची झाली असल्याचं सांगितलय. महिला त्यांचे वय लपवतात असं म्हटलं जातं पण हेमांगीने तिचं वय सांगत फिट लुक असलेला सुंदर फोटो शेयर केलाय. 

 

या पोस्टमध्ये हेमांगी लिहीते की, "गूगल वर जन्मतारीख बरोबर आहे पण सालाची नोंद चुकीची आहे याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी! धन्यवाद!" पुढे आणखी गमतीशीर गोष्ट तिने लिहीली आहे. "17 ते 20 वयोगटातील लोकं आता माझी आंटी म्हणून गणना करु शकतात. कारण आंटी म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय!"

हेमांगीच्या अशा बिनधास्त, सडेतोड आणि स्पष्ट व्यक्तिमत्त्वामुळे तिचा असंख्य चाहते आहेत. या चाहत्यांनी, मित्रमंडळींनी हेमांगीवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive