शाहरुख खानच्या त्या सीन्सचा शोध घेत आहेत आसाम पोलिस, ट्विटरवरुन दिली माहिती

By  
on  

आज संपूर्ण बॉलिवूडवर किंग खानचं राज्य आहे. अभिनयात तो सर्वांमध्ये बादशाह आहे. अनेक वर्षे तो बॉलिवूडवर आपलं साम्राज्य गाजवतोय. शाहरुखच्या चाहत्यांची संख्या अगणित आहे. चाहत्यांची शाहरुखला नेहमीच सर्वाधिक पसंती असते. पण आता नुकतंच एक वृत्त हाती आलं आहे, त्यानुसार आसाम पोलिस शाहरुख खानच्या सर्व सुपरहिट सिनेमांमधील सिग्नेचर पोज आणि स्टाईलचा शोध घेत आहेत. तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, की आसाम पोलिस आणि शाहरुख खान हे काय नवीन प्रकरण आहे.

तुम्ही चक्रावून गेला असाल तर तुम्हाला सांगतो, आसाम पोलिसांना एखाद्या ट्रॅफिक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी शाहरुखच्या पोजचा उपयोग केला आहे. लोक शाहरुखला प्रचंड प्रमाणात फॉलो करतात, त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी याचा उपयोग होईल. यासाठी आसाम पोलिसांनी शाहरुख खानकडून पोजचे कॉपी राईट घेतले असून त्याला याबाबतची माहिती ट्विटरवरुनही देण्यात आली आहे.

किंग खानने यासाठी आसाम पोलिसांना आपली परवानगीसुध्दा दिली आहे. याचा जर चांगल्या कामासाठी उपयोग होणार असेल तर माझा संपूर्ण सपोर्ट असून यासाठी मी आसामलासुध्दा जाईन, असे त्याचे म्हणणे आहे. या वृत्ताची माहिती सर्वात आधी आसामचे सहाय्यक पोलिस कमिशनर यांनी ट्विटरवरुन दिली. त्यांनी ट्रॅफिचे नियम आणि शाहरुखच्या सिग्नेचर पोजसह फोटो ट्विट केला आहे. शाहरुखनेसुध्दा या ट्विटला प्रतिक्रिया देत लोकांना ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले.

सिनेमांचा आणि त्यातील नायकांचा जनजागृतीसाठी अशाप्रकारे उपयोग करुन घेणं, ही एक उल्लेखनीय बाब आहे. सिनेमातील नायक हे अनेकांचे रोल मॉडेल असतात, त्यामुळे त्यांनी पटवून दिलेलं महत्त्व नेहमीच अंगीकारलं जातं.

Recommended

Loading...
Share