By  
on  

"चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात" म्हणत हेमांगी कवीने शेयर केली पोस्ट

अभिनेत्री हेमांगी कवीचा नुकताच वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने हेमांगीने तिचा सुंदर फोटो शेयर करत 40 वर्षांची झाली असून 41 व्या वर्षात पदार्पण केल्याचं म्हटलं होतं. ही पोस्ट पाहुन अनेकांना जणू धक्काच बसला. फोटोत दिसणारी हेमांगी इतकी फिट आणि तरुण दिसत होती की ती 40 वर्षांची झाल्याचं वाटत नसल्याचं अनेकांनी कमेंट्समध्ये सांगितलं. शिवाय हेमांगीला वाढदिवसानिमित्ताने भरभरुन शुभेच्छाही मिळाल्या. 

या कमेंट्स पाहुन आणि शुभेच्छा पाहुन हेमांगीने पुन्हा एक पोस्ट करुन सोशल मिडीयावर सगळ्यांचे आभार मानले आहेत. फोटो पाहुन मिळालेल्या प्रतिक्रियांवर हेमांगी या पोस्टमधून व्यक्त झालीय. ती लिहीते की, "तुमच्या शुभेच्छांसोबत, 'चल, काही काय? 40?' 'कुठल्या angel ने 40?' 'आईय्या अजूनही किती लहान दिसत्येस' '21 वर्षांची असशील' 'Age is just a number' अरे यार, 40? हिचं काय करायचं? '14 चं 41 चुकून लिहिलं असशील.. दुरुस्त कर' वगैरे वगैरे...हेच ऐकायची, वाचायची सुप्त इच्छा होती खरंतर काल, कारण चाळीशी झाली की बायकांना हे ऐकायचे खूपच वेध लागतात म्हणे असं मी पंचविशीची असताना ऐकलेली आणि खोटी वाटणारी गोष्ट काल खरी ठरली की राव! ही ही ही.  पण काल तुमच्या व्हॉट्सएप, फेसबूक, इन्स्टाग्राम वर आलेल्या गोड गोड कमेंट्स, टेक्स्ट, मेसेज, फोन कॉल्स मुळे, माझ्यावर लिहिलेल्या लेखांमुळे माझा वाढदिवस झकास झाला त्यासाठी प्रत्येकाला खूप धन्यवाद. ऐसे ही प्यार और आशीर्वाद बना रहे दोस्तों!"

 

असे म्हणत हेमांगीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या, तिचं आणि तिच्या फिटनेसचं कौतुक करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानलेत. शिवाय वाढदिवसाला घातलेल्या खास आउटफिटमधील सुंदर फोटोही शेयर केलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive