By  
on  

नवरी नटली ! वीणा जगतापच्या बहिणीचं लवकरच होणार लग्न, बहिणीच्या हळदी सोहळ्यात वीणाचा खास लुक

अभिनेत्री वीणा जगतापच्या आयुष्यात सध्या आनंदाचे क्षण सुरु आहे. कारण वीणाची बहीण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सध्या बहीणीची लगीनघाई आणि विविध सोहळ्याचा वीणा आनंद लुटतेय. या खास सोहळ्यांमध्ये ती कुटुंबासोबत रमलेली दिसतेय. 

वीणाने सोशल मिडीयावर बहीणीच्या लग्नाआधीच्या विविध कार्यक्रमांचे फोटो शेयर केले आहेत. नुकतच वीणाच्या बहिणीचा हळदी आणि मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी वीणा देखील खास लुकमध्ये नटलेली पाहायला मिळाली. 

वीणाने तिची बहीण आणि आईसोबतचे काही सुंदर फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. तेव्हा लवकरच वीणाच्या बहिणीच्या लग्नातील फोटोही पाहायला मिळतील. 

वीणाने अनेक हिंदी, मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलय. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून ती लोकप्रिय ठरली होती. मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात वीणा स्पर्धक म्हणून दिसली होती.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive