पाहा Photos : 'अरे कृष्णा... अरे कान्हा...' राधेच्या रुपात मृण्मयी देशपांडे

By  
on  

एक गुणी अभिनेत्री म्हणून मृण्मयी देशपांडेला आपण सर्वच ओळखतो. नाटक, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमांतून मृण्मयीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय.  पण तिने एक गुणी दिग्दर्शिका असल्याचंसुध्दा 'मन फकीरा' या सिनेमातून सिध्द केलं आहे.

मृण्मयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते.

सारेगमप लिटील चॅम्पसच्या यंदाच्या पर्वाची निेवेदिका असलेली मृण्मयी यातील विविध भागात खास लुकमध्ये पहायला मिळते.

नुकतंच गोकुळाष्टमीच्या निमित्ताने  मृण्मयी राधेच्या लुकमध्ये खुपच मनमोहक दिसली.

सारेगमपच्या छोट्या स्पर्धतांसोबत मृण्मयीचा विशेष रॅपो असल्याचं प्रत्येक भागात पाहायला मिळतं. 

तिच्या बहारदार निवेदनाने या संगीच मैफलीची रंगत आणखी वाढते. 

 

 

Recommended

Loading...
Share