By  
on  

पाहा Photo : खास सोहळ्यासाठी अमृता खानविलकरचा गॉर्जियस साडी लुक

एखादा कार्यक्रम किंवा सोहळ्यासाठी अभिनेत्री अमृता खानविलकर कायम खास लुकमध्ये दिसते. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यातही अमृताचा खास लुक पाहायला मिळाला. प्लॅनेट मराठी ओटीटी लाँच सोहळ्यासाठी अमृताने हा खास लुक केला होता. या लाँच सोहळ्यासाठी धक धक गर्ल माधुरी दीक्षितने हजेरी लावली होती.

यावेळी अमृताने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. या साडीवर सुंदर मोठ्या कानातल्यांनी शोभा वाढवली. मोकळ्या केसात हा लुक छान उठून दिसत होता. 

पिवळ्या रंगाच्या साडीवर स्लिवलेस गुलाबी ब्लाउज असा हा लुक लक्षवेधी ठरला. 

या लुकचे फोटो अमृताने सोशल मिडीयावर शेयर केले असून चाहत्यांनी या फोटोंना पसंती दर्शवली आहे. या फोटोंमध्ये अमृताचं मोहक सौंदर्य पाहायला मिळतय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive