By  
on  

पाहा Video : या कारणासाठी मराठी कलाकारांसोबत एकाच मंचावर दिसली धकधक गर्ल माधुरी दीक्षित, चक्क घेतला उखाणा

मोहक अदा, सौंदर्य, नृत्यकौशल्य यांचा संगम असलेली मनमोहक अदाकार आणि मनोरंजन विश्वातील सुपरस्टार माधुरी दीक्षित नुकतीच माहेरी आली. माहेरी म्हणजेच मराठी मनोरंजन विश्वातील एका कार्यक्रमाच्या मंचावर ती दिसली. निमित्त होतं प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या लाँच सोहळ्याचं. यावेळी माधुरीच्या हस्ते हा लाँच सोहळा पार पडला. 

या संपूर्ण सोहळ्यात माधुरी प्रचंड आनंदी दिसली. बॉलीवुडमध्ये काम करत असतानाही माधुरीचं मराठी प्रेम कायम पाहायला मिळालय. या कार्यक्रमातही मराठीत बोलत माधुरीने तिच्या भावना व्यक्त केल्या. शिवाय मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार या लाँच सोहळ्याला उपस्थित होते. अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सोनाली खरे, दीप्ती देवी, प्राजक्ता माळी, संजय जाधव, निखील महाजन, गायत्री दातार, तेजस्विनी पंडीत, सुशांत शेलार या इतर बऱ्याच कलाकारांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. 

या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष मात्र धकधक गर्लने वेधून घेतलं. यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मराठी भाषेविषयी असलेलं प्रेम यावर माधुरी भरभरुन बोलली. माधुरी जेव्हा मराठी कार्यक्रम किंवा सोहळ्यांना जाताना माधुरीची आई मात्र त्यासाठी कायम उत्सुक असल्याचं ती सांगते.

शिवाय आता माधुरी स्वत: प्लॅनेट मराठीचा भाग झाल्याचही ती म्हटलीय. तेव्हा आगामी काळात माधुरीचा या ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये महत्त्वाचा सहभाग असेल. 

या सोहळ्यात माधुरी मंचावर असताना अनेक लक्षवेधी क्षण पाहायला मिळाले. मराठी कलाकारांचं माधुरीने यावेळी सन्मानचिन्ह देऊन कौतुक केलं. तर उखाण्याची फर्माईश होताच अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या मदतीने तिने मराठीत उखाणाही घेतला.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive