By  
on  

सिद्धार्थ जाधवकडून आईच्या वाढदिवसाला खास शुभेच्छा, म्हणतो "तूझं हसणं हिच माझ्या आयुष्यातली खरी कमाई"

आई ही आपल्या सगळ्यांसाठीच आयुष्यातील महत्त्वाचा भाग असते. अभिनेता सिद्धार्थ जाधवसाठीही त्याच्या आयुष्यात आईचं स्थान महत्त्वाचं आहे. सिद्धार्थ हा कायम आई-वडीलांचा आदर करत त्यांच्याविषयी सोशल मिडीयावर लिहीताना दिसतो.

नुकतच सिद्धार्थच्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने त्याने सोशल मिडीयावर खास पोस्ट शेयर केली आहे. 

आईच्या वाढदिवसानिमित्ताने आईसोबतचा फोटो शेयर करत त्याने गोड मेसेज लिहीला आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ लिहीतो की, "वाढदिवसाच्या शुभेच्छा आये...सौ.मंदाकिनी रामचंद्र जाधव...आये.... तूझं हसणं...
हिच माझ्या आयुष्यातली खरी कमाई... आणि ही कमाई कमवण्यासाठी आयष्यभर राबायची तयारी आहे माझी...लव्ह यू आये....हॅपी बर्थडे...ओ माँ.."

आई आणि मुलाच्या या गोड फोटोवर प्रेक्षकांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive