By  
on  

.....आणि म्हणून मृण्मयीला करावे लागले विषारी साप असलेल्या तलावात नृत्य

सिनेमा म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या समोर येतात. ते म्हणजे चकाचक सेट्स कलाकारांचे छान-छान लुक्स, त्यांचे नृत्य या सर्व गोष्टींची आपल्यावर नेहमीच भुरळ पडते. पण यामागे कलाकारांना व संपूर्ण तंत्रज्ञान समूहाला किती मेहनत घ्यावी लागते, याबाबत मात्र आपण अनभिज्ञ असतो. नुकतंच आगामी ‘बोगदा’ या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमातील एका नृत्याचे चित्रिकरण करण्यासाठी मृण्मयीला चक्क तलावात नृत्य करावे लागले.

‘बोगदा’ सिनेमातील एका नृत्यासाठी तलावात चित्रिकरण करणं आवश्यक होतं आणि ही कथानकाची गरज होती. सिनेमाचं बरचसं चित्रिकरण कोकणात करण्यात आलं आहे. एका नृत्याचं चित्रिकरण वेंगुर्ला येथील तलावात करणं गरजेचं होतं. हा तलाव निर्मनुष्य जागी आणि जीर्ण मंदिराजवळ होता. त्यात अनेक विषारी साप, शेवाळं यांचा वास होता. या सिनेमाच्या टीमला सर्वप्रथम हा तलाव स्वच्छ करण्याचं अभियान हाती घ्यावं लागलं, मग विषारी जीव यात नाही याची खात्री करुन मृण्मयीला या तलावात नृत्य करण्यास सांगण्यात आलं. मृण्मयीने कोणतीही भीती न बाळगता या तलावात नत्य करत एका टेकमध्येच चित्रिकरण पूर्ण केले. सर्वांनीच संपूर्ण टीमचे या कठीण चित्रिकरणानिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे.

नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित- दिग्दर्शित 'बोगदा' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive