By  
on  

पाहा Photos : ही मराठी स्टारकीड लुक्समध्ये बॉलीवुड स्टारकीड्सलाही टाकतेय मागे

बॉलिवुडमध्ये तर स्टारकीड्सची कायम चर्चा असते. फक्त चर्चाच नाही तर आता सिनेमांमध्येही स्टारकीड्स बघायला मिळतात. मराठी मनोरंजन विश्वातही स्टारकीड्स करियर करताना दिसतात. त्यातच एक स्टारकीड सध्या चर्चेत आलीय. या स्टारकीडचे फोटो सोशल मिडीयावर सध्या चर्चेत आले आहेत.

ही स्टारकीड आहे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव यांची कन्या. तिचं नाव आहे आयुषी जाधव. आयुषीचं सोशल मिडीयावर अधिकृत अकाउंट आहे. शिवाय या अकाउंटवर तिचे एकापेक्षा एक फोटोशूट पाहायला मिळत आहेत. आयुषीने अद्याप मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेलं नाही मात्र तिचे फोटोशूट हे एखाद्या स्टारपेक्षा कमी नाहीत.

 

बॉलीवुड स्टारकीड्सनाही लाजवेल असे तिचे जबरदस्त लुक आणि फोटोशूट पाहायला मिळतय. उमेश जाधव यांची एक उत्तम नृत्यदिग्दर्शक म्हणून ओळख आहे. मराठीसह हिंदीतही त्यांनी काम केलय. त्यांनी आजवर दिग्दर्शित केलेली गाणी आणि डान्स स्टेप्स प्रचंड लोकप्रिय ठरलेत.

 

आता आयुषीसुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणार का ? की अभिनय क्षेत्रात तिची पावलं वळतील हे आगामी काळात समोर येईलच.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive