By  
on  

पाहा Teaser : कोण आहे लीला पासवान ? लवकरच प्रदर्शित होणार 'एक थी बेगम 2' सिरीज

सत्य घटनांवर प्रेरित एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम'च्या पहिल्या सिझनने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. यातील साहसी आणि धाडसी अशरफ उर्फ सपनाने घातक स्त्री बनून पतीच्या हत्येचा बदला घेण्याची शपथ घेतल्याचं पाहायला मिळालं होत. तिने तिरस्काराची परिसीमा गाठली. तिने सर्व बाबी स्वतःच्या हातात घेतल्या आणि एका अशा वळणावर येऊन सिझन 1 चा शेवट झाला, जिथे अशरफचे आयुष्य शिल्लक आहे की नाही, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. 

आता एक थी बेगमचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ज्यात सपना जिवंत आहे का ? पुढे नेमकं काय होतं ? या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नुकताच  'एक  थी बेगम 2' चा टीझर प्रदर्शित झालाय. ज्यात सपनाची झलक पाहायला मिळतेय. अभिनेत्री अनुजा साठ्येने ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी पहिल्या सिझनमध्ये अनुजावर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आता दुसऱ्या सिझनमध्ये काय पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित 'एक थी बेगम 2' लीला पासवान या महिलेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिचे नाव प्रामुख्याने पुरुषांच्या जगातच प्रसिद्ध नसून अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणीही तिच्या शोधात आहेत. तज्ज्ञांच्या मते ती सामान्य स्त्री नाही. मग कोण आहे लीला पासवान? हे या सिरीजमधून समोर येईलच. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive