By  
on  

बोस्टॉन फिल्म फेस्टिवलमध्ये सलील कुलकर्णी यांच्या 'एकदा काय झालं' चित्रपटाला तीन नामांकनं

मराठी मनोरंजन विश्वातील प्रख्यात संगीतकार सलील कुलकर्णी हे लवकरच खास चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याआधीच हा चित्रपट विविध महोत्सवात पसंतीची पावती मिळवतोय. 'एकदा काय झालं' असं या चित्रपटाचं नाव आहे. नुकतच बोस्टॉन फिल्म फेस्टिवलमध्ये या सिनेमाला नामांकन मिळालय. 

नुकतीच ही आनंदाची बातमी सलील यांनी सोशल मिडीयावर शेयर केली आहे. या चित्रपटात अभिनेता सुमीत राघवन, उर्मिला कोठारे आणि बालकलाकार अर्जून हे कलाकार आहेत. बोस्टॉन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तीन विभागासाठी नामांकन मिळालय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी सुमीत राघवनला नामांकन मिळालय. तर सर्वोत्कृष्ट बालकलाकारासाठी अर्जून पूर्णपात्रेला नामांकन मिळालय. शिवाय रे क्षणा या गाण्यालाही सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी नामांकन आहे. हा आनंद सलील यांनी सोशल मिडीयावर शेयर करत निर्माते आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.ा

या चित्रपटाच्या निमित्ताने सलील कुलकर्णी यांनी लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive