पाहा Video : उमेश कामतची पहिली कमाई होती चक्क 50 रुपये, मुक्ता बर्वेच्या या प्रश्नांची दिली उत्तरं

By  
on  

'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे ही जोडी प्रेक्षकांची मनं जिंकतेय. या मालिकेतील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडतेय. दोघांमधील वाद, मैत्री, रोमान्स या सगळ्या गोष्टी मालिकेतून लक्ष वेधून घेत आहेत. यातच उमेश आणि मुक्ताच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलय. या व्हिडीओत मुक्ता ही उमेशला काही प्रश्नं विचारतेय. मुक्ताने उमेशला तब्बल 35 प्रश्ने विचारली आहेत. यापैकी काही प्रश्नांची उत्तर ऐकून हसू आवरणार नाही.

या व्हिडीओत मुक्ता ही उमेशला त्याच्या पहिल्या कमाईविषयी विचारतेय. तेव्हा उमेशने याचं उत्तर देताना 50 रुपये हे उत्तर सांगितलं. शिवाय पहिल्या गर्लफ्रेंड विषयी विचारताच कॉलेजमध्ये असताना गर्लफ्रेंड नसल्याचं त्याने सांगितलं. ग्रॅज्युएशन नंतर गर्लफ्रेंड होती असं उत्तर उमेशने यावेळी दिलं. या उत्तरावर मुक्ताने शॉकिंग प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आवडती अभिनेत्री कोण या प्रश्नावर उमेशने मुक्ताचच नाव घेतलय. 

 

पुढे मुक्ताने उमेशला सर्वोत्तम प्रशंसेविषयी विचारलं. यावेळी एका नाटकाची खास आठवण त्याने शेयर केली. उमेशच्या एका नाटकाच्या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी मध्यांतराला त्यांचे पाणावलेले डोळे हे उमेशसाठी फार मोठी कॉम्प्लिमेंट होती. शिवाय उमेशने एका चाहतीचा अनुभवही शेयर केला. गोव्याला एका प्रयोगासाठी गेले असताना एक चाहती उमेशला पाहुन रडू लागली होती. त्यावेळी तिच्या पतिने तिचे डोळे पुसून ती उमेशची मोठी चाहती असल्याचं उमेशला सांगितलं होतं.

यासह एकूण 35 प्रश्नांची उत्तर यावेळी उमेशने दिली आहेत. या व्हिडीओतून उमेश विषयीच्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या असून त्याच्या चाहत्यांनासाठी हा व्हिडीओ खास पर्वणी ठरलाय.

Recommended

Loading...
Share