काही दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या देसी गर्ल प्रियंका चोप्राच्या आगामी बॉलिवूड प्रोजक्टविषयी मीडियामध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रियंका पहिल्यांदा शोनाली बोसचं प्रोजेक्ट सुरू करणार की सलमानचं इथंपासून ते तिचं सलमानचा सिनेमा ‘भारत’ सोडणं आणि तिच्या निक जोनससोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांपर्यंत प्रियंका सतत चर्चेत होती. म्हणूनच तर प्रियंका बॉलीवूडची सध्याची टॉप ट्रेंडिंग अभिनेत्री बनली आहे.
सलमानचा सिनेमा ‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफरने सोशल मीडियावर प्रियंका भारत सिनेमा सोडत असल्याची घोषणा करतानाच 'इन निक ऑफ टाइम' चा सूचक उल्लेख केला होता. त्यामूळे प्रियंका चर्चेत आली होती. 94 गुणांसह स्कोर ट्रेन्ड्स इंडिया चार्टवर अग्रस्थानी असलेली प्रियंका चोप्रा देशातली सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री बनलेली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, "आपल्या वाढदिवसाच्या सुमारास भारतात परतलेली प्रियंका निक जोनससोबत गोव्यात फिरायला गेली होती, त्यानंतर प्रियंकाने शोनालीची फिल्म आणि सलमानसोबत भारत हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. यामुळे अर्थातच ती सतत बातम्यांमध्ये आणि सोशल मिडीयामध्ये चर्चेत राहिली. आता तर ‘भारत’ सोडल्यावर आणि तिच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे ती सतत ट्रेंड होत आहे. त्यामूळेच अचानक टॉप ट्रेडिंग अभिनेत्री बनलेली प्रियंका लोकप्रियतेत बॉलिवूडची नंबर वन अभिनेत्री बनली आहे. “
अश्वनी कौल पूढे म्हणतात, " 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून आम्ही डेटा गोळा करतो. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”