"आणि आम्ही हो म्हटलं", अभिजीत आणि सुखदाने शेयर केली ही आनंदाची बातमी

By  
on  

प्रत्येक कपलसाठी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक नवी गोष्ट खास असते. अभिनेता अभिजीत आणि सुखदा खांडकेकरच्या आयुष्यातही असा एक खास क्षण आलाय. हा आनंद त्यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केला आहे. ही खास बातमी सोशल मिडीयावर त्यांनी सेयर करुन भावना व्यक्त केल्या आहेत.

तर ही आनंदी बातमी आहे त्यांच्या नव्या घराची अभिजीत आणि सुखदाने नुकतच नवं घर घेतलय. याच नव्या घराचा आनंद त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केलाय. अभिजीतने सोशल मिडीयावर लिहीलय की, "आणि आम्ही हो म्हटलो... आमच्या नवा पत्त्याला. आमच्या नव्या भिंतींना आनंद कळेल. प्रत्येक खोलीत हास्य असू देत. प्रत्येक खिडकी मोठ्या शक्यतेसाठी खुली असू दे."

या पोस्टमध्ये अभिजीतने सुखदासोबतचा गोड फोटो शेयर केलाय. शिवाय दोघांच्या अंगठ्याला ठश्यासाठी लागलेली शाई असलेला फोटोही शेयर केलाय.

 

Recommended

Loading...
Share