Video : कुणीतरी येणार येणार गं ! 'ती परत आलीये'च्या ' टिक्या आणि हणम्याची डान्स मस्ती

By  
on  

ती परत आलीय ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय हॉरर-थ्रीलर मालिका. या मालिकेने अल्पावधितच आपला मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. वेबसिरीज फॉरमॅटमध्ये असलेली ही मालिका खुप पसंतीस उतरतेय. दररोज येणारी उत्कंठावर्धक वळणं पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या ९-१० मित्र मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे. त्यामुळे सर्वच तरुण कलाकार मालिकेत पाहायला मिळतायत. 

मालिकेतील कलाकारांची ऑफ-स्क्रीन खुप धम्माल सुरु असते. सोशल मिडीयावर याचा अंदाज येतो.  आधी अभ्या आणि आता मॅण्डीचा खून झाल्यानंतर मित्र-मैत्रिणी रिसॉर्टवर मन रमवण्याच्या प्रयत्नात असतानाच प्रेग्नेंट रोहिणीच्या डोहाळे जेवणाचा प्लॅन आखतात असा प्रोमो सध्या पाहायला मिळतोय. पण मालिकेच्या याच सीनवर टिक्या आणि हणम्याने धम्माल तार धरलाय.

कुणीतरी येणार येणार गं या गाण्यावर दोघंही धम्माल करताना पाहायला मिळाले. टिक्याने तर चक्क रोहिणीचा ड्रेस घालून प्रेग्नेंट असल्यासारखा अभिनय केलाय. त्यामुळेच अभिनेता प्रथमेश शिवलकर आणि अभिनेता समीर खांडेकर यांची ही डान्स मस्ती तुम्हाला खळखळून हसवेल यात शंका नाही.  आज अशीही बनवाबनवी सिनेमाला ३३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मिडीयावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. 

 

चाहत्यांनी ह्या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Recommended

Loading...
Share