गेल्या काही महिन्यात अनेक नव्या विषयांवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. विशेष म्हणजे अनेक सिनेता-यांनीही यावेळी मालिकांमधून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. त्यामुळेच मालिकांना खास असा प्रेक्षकवर्गही मिळाला आहे.
अभिनेता श्रेयस तळपदेनंतर आता बॉलिवूडमध्ये झळकलेला आणखी एक मराठमोळा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेशही आता छोट्या पडद्यावर दिसणार असल्याचं समोर येत आहे. एका पोर्टलने याबाबत बातमी दिली आहे. रितेश यापुर्वी ‘विकता का उत्तर’ या शोच्या सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला होता. आता नव्या प्रोजेक्टमध्ये तो नक्की कशाप्रकारे छोट्या पडद्यावर दिसणार याची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असेल.