बोस्टॉन फिल्म फेस्टीव्हल मध्ये ‘एकदा काय झालं’ ची तीन पुरस्कारांवर मोहोर

By  
on  

‘इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बॉस्टन २०२१’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवामध्ये डॉ सलील कुलकर्णी यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ‘एकदा काय झालं...’चे विविध तीन विभागांमध्ये नामांकन झाल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. 

 

 

या फेस्टीव्हलमध्ये सुमीत राघवनचे नामांकन सर्वोत्कृष्ट अभिनेता, अर्जुन पूर्णपात्रेचे नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकार तर ‘रे क्षणा...’ या गाण्याचे नामांकन सर्वोत्कृष्ट गीत या विभागांमध्ये मिळालं होतं हे गाणे शंकर महादेवन यांनी गायले असून ते सलिल कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केले आहे. संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांनी हे गाणे लिहिले आहे. आनंदाची बाब म्हणजे, या तिनही विभागातील पुरस्कार या सिनेमाने जिंकले आहेत. सलील यांनी  फोटो पोस्ट करत ही आनंदाची बाब शेअर केली आहे. 

Recommended

Loading...
Share