By  
on  

'एक थी बेगम 2' साठी अनुजा साठेने हातात घेतली खरी बंदूक, म्हटली "अनुभव शहारे आणणारा"

 अनेक एक्शन चित्रपट, मालिका, सिरीज किंवा जाहिरातीत आपण विविध पात्रांना सहजरित्या गोळीबार करताना, रक्तपात करताना आणि बंदुकी वापरताना पाहतो. पण या सगळ्यात खोट्या हुबेहुब दिसणाऱ्या पिस्तुल, बंदुका चित्रीकरणासाठी खोटं वापरल्या जातात. अनेकदा त्यातला खरेपणा जाणवण्यासाठी खऱ्या वस्तूही एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली वापरल्या जातात.

असेच काहीसे एक्शन सीन करताना दिसणार आहे अभिनेत्री अनुजा साठे. एक थी बेगम या सिरीजच्या दुसऱ्या सिझनच्या निमित्ताने अनुजा मोठ्या प्रमाणात एक्शन करताना दिसणारेय. यासाठी तिने अतिशय सहजरित्या बंदूक हाताळली आहे. अर्थात त्यासाठी तिने प्रशिक्षण घेतले. 

बंदूक हाताळण्याच्या अनुभवाबद्दल अनुजा साठे म्हणते, '' आयुष्यात पहिल्यांदा हातात जेव्हा मी बंदूक घेतली होती तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते. आणि ही अजिबात अतिशयोक्ती नाही. 'एक थी बेगम 2' मधील माझी भूमिकेची गरज म्हणून मी बंदूक हाताळली, तो अनुभव खूपच दडपण आणणारा आणि भीतीदायक होता. परंतु जेव्हा तुम्ही सूडाच्या भावनेने जेव्हा पेटलेले असता, तेव्हा हे सर्व नगण्य होऊन जाते. शूटिंगच्या सेटवर बंदूक चालवण्याअगोदर मी  प्रशिक्षण घेतले होते, ज्याचा मला निश्चितच फायदा झाला.''  

एक थी बेगम च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने सुरु होते. मृत्यूचे सोंग घेतलेली अशरफ दुबईचा डॉन मकसूद (अजय गेही) ला संपवण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावते. आपला पती झहीरच्या(अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेवर ती ठाम राहाते. अशरफ स्वतःला गुन्हेगारी जगतात झोकून देते. 

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित 'एक थी बेगम'च्या दुसऱ्या सीझनमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसाटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णानदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 30 सप्टेंबरपासून ही सिरीज एमएक्स प्लेयर ओरिजनलवर पाहायला मिळणार आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive