By  
on  

पाहा Video : वैभव तत्ववादी झळकणार 'ग्रे' चित्रपटात, चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता वैभव तत्ववादी आजवर विविध भूमिकांमधून समोर आलाय. पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज झालाय. ग्रे या रहस्यमय थरारक चित्रपटातून वैभव समोर येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय.

 

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव 'सिद्धांत' नामक एका युवकाची भूमिका साकारतोय. ग्रे ”ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर हे कलाकार झळकणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटाला लाभली आहे.

 

रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या 1 ऑक्टोबरला झी 5 प्रीमियर वर प्रदर्शित होतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive