By  
on  

मुक्ता बर्वेच्या आगामी लघुपटाची 8 आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल्समध्ये निवड तर पटकावले 2 पुरस्कार

उत्तम अभिनयकौशल्याने अभिनेत्री मुक्ता बर्वे कायम प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक बनली. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून मुक्ताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीय. पुन्हा एकदा एका लघुपटाच्या माध्यमातून मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'चंद सांसे' असं या लघुपटाचं नाव असून प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंसोबत ती या लघुपटात झळकणार आहे. मात्र सोशल मिडीयावर मुक्ताने या लघुपटाविषयी एक महत्त्वाची बातमी शेयर केली आहे. या लघुपटाने विविध आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात माजी मारली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

 

या लघुपटाची तब्बल 8 आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात निवड झाली आहे. एवढच नाही तर या लघुपटाने दोन पुरस्कारही पटकावले आहेत. ही आनंदाची बातमी शेयर करत मुक्ताने लघुपटाचा पोस्टर शेयर केला आहे. या लघुपटात मुक्ताची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सोशल मिडीयावर मुक्ताच्या या पोस्टवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सध्या 'अजुनही बरसात आहे' या मालिकेतून मुक्ता प्रेक्षकांची मनं जिंकतेय. या मालिकेत मुक्ता आणि उमेशची जोडी झळकत असून ही जोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive