एकता कपूर प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात झळकणार सिध्दार्थ आणि परिणिती

By  
on  

चार वर्षांपूर्वी आलेल्या ‘हसी तो फसी’ या सिनेमात एकत्र झळकल्यानंतर अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. एकता कपूर आणि शैलेश सिंह यांच्या प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात ही जोडी पाहायला मिळेल.

पुढच्या आठवड्यापासून सिध्दार्थ आणि परिणीती या नवीन सिनेमाच्या शुटींगला सुरुवात करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सिनेमाचं संपूर्ण शुटींग उत्तर प्रदेशमध्ये होईल व पहिलं शेड्यूल बिहारमध्ये ठेवण्यात आल्याचं समजतंय. बिहार म्हटल्यावर दोघंही देसी अवतारात दिसणार, यात शंका नाही. दोघंही सध्या आपल्या व्यक्तीरेखांसाठी जोरदार तयारी करत आहेत. या भूमिकांसाठी बिहारी भाषा शिकण्याचासुध्दा ते प्रयत्न करत आहेत.

‘तन्नू वेड्स मन्नू’ आणि ‘रांझणा’ सिनेमासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारे प्रशांत सिंह हे सिध्दार्थ आणि परिणीतीच्या या आगामी सिनेमाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. सर्वांनाच एकता कपूर प्रोडक्शनच्या य़ा नवीन सिनेमाची प्रचंड उत्सुकता आहे.

 

 

Recommended

Loading...
Share