By  
on  

'बाबू' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात, झळकणार अंकित मोहन

'बाबू' चित्रपटाचं नुकतच टिझर पोस्टर प्रदर्शित झालय. त्यानंतर या सिनेमाविषयी उत्सुकता वाढलीय. या पोस्टमधून रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होत.

श्री कृपा प्रोडक्शन निर्मित 'बाबू' या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले असून बाबू के. भोईर निर्माता आहेत. नुकतीच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आलीय. या चित्रपटाचे मुंबईमध्ये चित्रीकरण सुरु झाले असून ‘बाबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय.

अनेक हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेल्या अंकित मोहनसोबत या चित्रपटात नेहा महाजन, रुचिरा जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून अंकितचा हटके अंदाज पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या काळात 'बाबू' चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive