नुकताच सुरु झालेला बिग बॉस मराठीचा तिसरा सिझनही लक्षवेधी ठरतोय. विविध स्पर्धक आणि टास्कनी सजलेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवताना दिसतोय. सोशल मिडीयावरही या कार्यक्रमाची चर्चा सुरु आहे. अभिनेता अक्षय वाघमारे देखील यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून खेळतोय.
मात्र बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी अक्षयने एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. या घरात जाण्याआधी त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अक्षयने मरणोत्तर अवयवदानाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अक्षयने घेतलेल्या या निर्णयामुळे त्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात आदर निर्माण केलाय.
यासाठी संबंधित संस्थेकडे त्याने मरणोत्तर अवयवदानाचे संमतीपत्र भरून दिलय. त्या संमती पत्रानुसार तो मृत्यूनंतर फुफ्फुस, मुत्रपिंड, स्वादुपिंड, किडनी आणि त्वचा दान करणार असल्याचे सिद्ध झालय. विशेष म्हणजे याबद्दल खूपच कमी जणांना माहिती आहे. अक्षयच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतय.
बिग बॉस मराठीच्या घरात अक्षय हा विविध टास्क जिद्दीने खेळताना दिसतोय. पुढे या घरात तो कसा खेळेल ? काय असेल त्याची स्ट्रॅटेजी हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.