By  
on  

Anniversary Special : प्रिया आणि उमेशने लग्नात एकमेकांसाठी घेतला होता हा उखाणा, पाहा Video

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही मराठी सिनेविश्वातील क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात.

कधी एकत्र स्वयंपाक करताना तर कधी वर्कआऊट करतानाचे त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. दोघांच्या अभिनयाने आणि धम्माल केमिस्ट्रीने सजलेल्या 'आणि काय हवं..'  ह्या सुपरहीट वेबसिरीजच्या तब्बल तीन सीझन्सी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं. 

आज 6 ऑक्टोबर म्हणजे, प्रिया आणि उमेश यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने दोघांनी आपल्या सहजीवनाचा सुरुवातीपासून ते आत्तपर्यंतच्या प्रवासाची झलक एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसमोर सादर केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेश आणि प्रिया यांच्या वयात 8 वर्षाचे अंतर आहे. या कारणामुळे उमेश लग्नाबाबत साशंक होता. यासाठी त्याने सहा वर्षाचा वेळ घेतला आणि अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नासाठी प्रियानेच पुढाकार घेतला होता. 6 ऑक्टोबर 2011साली प्रिया आणि उमेशने नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत थाटामाटात लग्नगाठ बांधली. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

प्रिया आणि उमेशने ल्गनात एकमेकांसाठी घेतलेला उखाणा या व्हिडीओच्या माध्यमातून आता पुन्हा ऐकायला मिळतोय. प्रियानेच हा व्हिडीओ शेअर करत लग्नातील सर्व आठवणी ताज्या केल्या आहेत.  

 

 खरंच दोघंही अगदी मेड फॉर इच अदर आहेत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive