'अमृत कला'च्या माध्यमातून अभिनेत्री अमृता खानविलकर तिचं नृत्यकौशल्य सगळ्यांसमोर घेऊन येत असताना तिच्या नृत्याची आवडही जोपासतेय. यातच एखादा सण, उत्सव असला की मग त्या पद्धतिच्या गाण्यांवरही डान्स करून त्याचे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर करते. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने असाच एक खास व्हिडीओ पाहायला मिळतोय.
घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अमृताने खास डान्स व्हिडीओ शेयर केलाय. रामलीला सिनेमातील नगाडे संग ढोल बाजे या प्रसिद्ध गाण्यावर अमृता थिरकली आहे. अमृताचा हा खास गरबा डान्स लक्ष वेधू घेतोय. गरब्यात हे गाणं चांगलच चर्चेत असतं. नवरात्रोत्सवात हे गाणं मोठ्या प्रमाणात वाजवलं जातं. म्हणूनच अमृताने या गाण्याची निवड करत या गाण्यावर सुंदर गरबा डान्स केलाय.
सोशल मिडीयावर अमृताच्या या डान्स व्हिडीओला पसंती मिळतेय. याशिवाय अमृताचे विविध डान्स व्हिडीओ चर्चेत आले आहेत. 'अमृत कला' च्या माध्यमातून अमृता विविध गाण्यांवरील डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करतेय. ज्याला चाहत्यांचा भरगोस प्रतिसाद मिळताना दिसतोय. काही व्हिडीओत अमृताने प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलसोबतही डान्स केलाय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओत अमृता ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसोबत थिरकताना दिसली होती.