By  
on  

पाहा Video : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विशाखा सुभेदारनी सादर केला 'जोगवा'

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ दिवस नऊ रंगांचे महत्त्व लक्षात घेऊन त्या त्या रंगांचे कपडे परिधान केले जातात. सोशल मिडीयावर नवरात्रीत हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र मनोरंजन विश्वातील काही कलाकार नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने विविध कला सादर करतानाही दिसत आहेत. काही कलाकारांनी नऊ दिवस देवीची नऊ रुपे धारण करुन केलेले फोटोशूट पोस्ट केले जात आहेत तर काहींनी गरबा डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केलाय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Latika Shriyan (@latsdances)

 

यात अभिनेत्री विशाखा सुभेदार लक्ष वेधून घेतेय. विशाखा यांनी जोगवा डान्स करत त्यांची कला सादर केलीय. शिवाय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हा खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. जोगवा ही पारंपारिक नृत्यकला त्यांनी सादर केली आहे. विशाखा यांच्या सोबतीला नृत्यदिग्दर्शिका लतिकाही दिसतेय. दोघांच्या या जोगवा डान्सची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे.

विशाखा यांनी आजवर विविध मालिका, नाटक, चित्रपटांमधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून तर त्या प्रेक्षकांना खळखळून हसवतात. विशाखा यांना अभिनयासह नृत्यकौशल्यही अवगत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी सादर केलेलं नृत्यही आता सगळ्यांचं लक्ष वेधून घेतय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive