By  
on  

'कारवां' गर्ल मिथिला पालकरचे हे टॉप 5 लूक्स तुम्ही पाहिले का ?

एक चुणचुणीत आणि सुंदर, गोड अभिनेत्री म्हणून अल्पावधीतच आपल्या अभिनयाने सर्वांवर भुरळ पाडणारी अभिनेत्री मिथीला पालकर लवकरच ‘कारवां’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एका कप-सॉंगमुळे प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या मिथीलाच्य अभिनयाची जादू अनेक वेब सिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मुरांबा या मराठी सिनेमातील तिच्या प्रमुख भूमिकेचंसुध्दा प्रचंड कौतुक झालं. ती नेहमीच स्वत:च्या अभिनयाची छाप पाडते. पण लूक्समध्येसुध्दा ही गुणी अभिनेत्री हटके ठरते. मिथीला हिला फॅशनची विशेष आवड आहे. ती नेहमी स्वत:चे विविध फोटोशूट करत असते.  मिथीलाचे विविध लुक्स खास पाहा https://marathi.peepingmoon.com वर

लहान असली तरी सौंदर्य आणि अभिनय यांचा सुंदर मिलाफ मिथीलाने घडवून आणला आहे.

आपल्या कुरळ्या केसांच्या हटके लुक्समुळे मिथीला खुप सुंदर दिसते.

लाल रंगांची गडद लिपस्टीक आणि या वेस्टर्न आऊटफिटमध्ये मिथीला खुप खुलून दिसतेय.

 

कुरळे केसांच्या नेहमीच्या लुक्सला थोडावेळा साठी बाय-बाय करत मिथीलाने हा स्ट्रेट लुक केला आहे.

 

सध्या 'कारवां' या बॉलिवूड सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये बिझी असलेली मिथीला, यावेळी आपल्या हटके अंदाजात स्वत:ला प्रेझेंट करतेय.मिथीला पालकर या गुणी अभिनेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'कारवां' हा सिनेमा येत्या 3 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive