अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी केले भोंडल्याचे आयोजन, मानसी नाईकसह या सख्यांनी लावली हजेरी

By  
on  

 नुकतच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींनी मिळून पारंपरिक भोंडला साजरा केलाय. अभिनेत्री अर्चना नेवरेकर व लीना नांदगावकर यांनी मिळून या भोंडल्याचे आयोजन केले.

कोरोना काळात भेटीगाठी थांबल्या होत्या मात्र आता हळू हळू परिस्थती पूर्वपदावर येत आहे. म्हणूनच नवरात्रीचे औचित्य साधत या सख्यांनी भोंडला कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

या कार्यक्रमाला अर्चना नेवरेकर,लीना नांदगावकर, सुप्रिया पाठारे, शिल्पा नवलकर, नियती राजवाडे, अदिती सारंगधर, वनश्री पांडे. मानसी नाईक, मेघा धाडे, पल्लवी  प्रधान, सुलेखा तळवलकर, रोहिणी  निनावे, कांचन अधिकारी, नितु  जोशी, डॉ पूर्णिमा म्हात्रे, रेखा सहाय, वनिता कुंभारे, सोनल खानोलकर उपस्थित होते.

 या निमित्ताने नुकतच लग्न झालेल्या अभिनेत्री मानसी नाईक खरेराचे गोड कौतुक करून ओटी भरण्यात आली.  

Recommended

Loading...
Share