पाहा Photos : मानसी नाईक आणि प्रदीप खरेराच्या या फोटोशूटने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By  
on  

सोशल मिडीयावर मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा हे कपल चांगलच चर्चेत असतं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होत असतात. यातच दोघांनी नुकतच केलेलं नवं फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. 

या नव्या फोटोशूटमध्ये मानसी आणि प्रदीपने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. लाईन्स स्टाईल असलेल्या या खास पेहरावात हे कपल चांगलच उठून दिसतय. शिवाय दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळतेय. कॅज्युअल फॉर्मल कपड्यांमध्ये दोघही सुंदर दिसत आहेत. प्रदीपच्या युट्यूब चॅनेलवरही या जोडीची धमाल पाहायला मिळते.मात्र नुकतच केलेलं हे फोटोशूट चांगलच व्हायरल झालय.

मानसीने या आउटफीटमधील खास व्हिडीओही नुकताच शेयर केलाय.

मागील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये मानसीने प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. त्यानंतर याच वर्षी दोघांनी लगीनगाठ बांधली आहे. सोशल मिडीयावर हे कपलं मोठ्या प्रमाणात चर्चेत असतं.

 

Recommended

Loading...
Share