By  
on  

पाहा Video : नऊवारी साडीत हेमांगी कवीचा नखरेल अंदाज, म्हटली "हो हो मराठी गाण्यावर ही केलंय..."

अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडीयावर चाहत्यांंचं लक्ष वेधून घेते. कधी विविध व्हिडीओ तर कधी हेमांगीच्या फोटोंची चर्चा असते. हेमांगीने नुकतेच शेयर केलेले व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर चर्चेत आलेत.

इन्स्टाग्रामवर हेमांगीचे रील्स मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. यातच हेमांगीचा नवा रील लक्ष वेधून घेतोय. या रीलमध्ये हेमांगीच्या अदा पाहायला मिळत आहेत.

 

जांभळ्या रंगाची नऊवारी, नथ अशा मराठमोळ्या लुकमध्ये हेमांगी दिसतेय. यातच तिने विविध गाण्यांवर व्हिडीओ केले आहेत. "इश्काचा बाण" या गाण्यावर हेमांगीने व्हिडीओ केलाय. यात हेमांगीचा सुंदर लुक पाहायला मिळतोय.शिवाय या पोस्टमध्ये हेमांगी लिहीते की, "हो हो...मराठी गाण्यावर ही केलंय रील"

 

तर "रुप सुहाना लगता है" या गाण्यावरही हेमांगीने नऊवारीत सुंदर व्हिडीओ केलाय. या व्हिडीओंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive