By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या लेहंगा लूकने वेधलं लक्षं

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकतेय. या मालिकेच्या निमित्ताने प्रार्थना अभिनेता श्रेयस तळपदेसोबत झळकतेय. सोशल मिडीयावर आधीच प्रार्थनाचा मोठा चाहतावर्ग आहे. यातच प्रार्थना मालिकेत झळकत असल्याने हे चाहते प्रार्थनाच्या प्रत्येक पोस्टसाठी उत्सुक असतात.

अशाच एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलय. या पोस्टमध्ये प्रार्थनाचा खास लूक पाहायला मिळतोय.

प्रार्थनाने तिचं नुकतच केलेलं सुंदर फोटोशूट शेयर केलय. या फोटोशूटमध्ये प्रार्थनाने लेहंगा परिधान केलाय. मरुन रंगाच्या या लेहंग्यात प्रार्थना अतिशय सुंदर दिसतेय. म्हणूनच चाहत्यांनीही या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केलाय.

इन्स्टाग्रामवर प्रार्थनाचे 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. या चाहत्यांसाठी प्रार्थना विविध पोस्ट करताना दिसते. शिवाय 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील भूमिकेसाठीही प्रेक्षक आणि चाहते तिच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive