अभिनेत्री नेहा पेंडसे टिव्ही आणि सिल्व्हर स्क्रिनवरील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिचा बोल्ड अवतार आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला आहे. पण काही दिवसांपासून ती अभिनयापासून दूर असल्याचे दिसून आले आहे. तिच्यात वर्कआऊटमुळे झालेला मोठा बदल आपल्याला यापूर्वी दिसून आला आहे. ती आपल्या फिटनेसबद्दल खुपच जागृत असते. फक्त ऑन-स्क्रिन परफेक्ट दिसण्यासाठीच नाही तर फिट राहण्यासाठी जिममध्ये ती भरपूर घाम गाळते.
नेहाने नुकताच आपल्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती वर्कआऊटचे कठीण प्रकार करताना दिसून येत आहे. तसंच तिने याबाबत तिच्या जीम मार्गदर्शकाचा उल्लेख करत म्हटलंय, “तुमच्या योग्य मार्गदर्शनाखाली मी वर्कआऊटचा हा कठीण प्रकार करते आहे.” नेहाच्या भरपूर वर्कआऊट करण्यामागचं रहस्य अद्याप तरी उलगडलेलं नाही. तिची आगामी मालिका किंवा सिनेमाबद्दल अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही. पण तिचं हे वर्कआऊट सर्व मित्रांसाठी आणि चाहत्यांसाठी हे एक प्रेरणा ठरेल, हे मात्र नक्की आहे.