दिवाळीच्या निमित्ताने सोशल मिडीयावरही मनोरंजन विश्वातील कलाकारांचे पारंपरिक वेशभुषेतील फोटो पाहायला मिळत आहेत. यात सैराट फेम रिंकू राजगुरुचे फोटोही लक्ष वेधून घेत आहेत. रिंकूने नुकतच दिवाळी निमित्ताने खास फोटोशूट केलय. यात रिंकूचा ट्रेडिशनल लुक पाहायला मिळतोय.
या फोटोशूटमधील फोटोंमध्ये रिंकूने सुंदर साडी नेसलीय. काही फोटोंमध्ये रिंकूचा मराठमोळा पारंपारिक साज पाहायला मिळतोय. नऊवारी, गजरा, दागिने परिधान करून सुंदर पेहराव करण्यात आलाय. या फोटोशूटमधील नव्या सिरीजमधील फोटो तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. या पारंपारिक साजात जुन्या पद्धतिने साडी परिधान केल्याचं पाहायला मिळतय. हातात समई घेऊन काढलेला फोटो तर लक्ष वेधून घेतोय.
रिंकूच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय. शिवाय कमेंट्समध्येही या लुकचं कौतुक करण्यात आलय. सोशल मिडीयावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. आणि या चाहत्यांना रिंकूचा हा दिवाळी लुक प्रचंड आवडलाय.