By  
on  

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतला पतीकडून मिळालं हे खास गिफ्ट

दिपावलीच्या निमित्ताने आपल्या प्रियजनांना विविध भेटवस्तू दिल्या जातात. त्यातच दिवाळी पाडव्यालाही पती-पत्नि एकमेकांना भेटवस्तू देतात. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतला खास भेटवस्तून मिळालीय. नुकताच पाडवा पार पडला. यावेळी पाडव्याच्या निमित्ताने शर्मिष्ठाला पती तेजस देसाईने पाडव्याचं खास गिफ्ट दिलय.

हे गिफ्ट आहे टू व्हिलर म्हणजे नवी कोरी स्कूटर. शर्मिष्ठाला स्कूटर चालवण्याची प्रचंड आवड आहे. म्हणूनच तिची आवड लक्षात घेऊन तेजसने तिला हे खास गिफ्ट दिलय. शर्मिष्ठाने सोशल मिडीयावर तिच्या या गिफ्टसोबतचा फोटो शेयर केलाय.

हे गिफ्ट पाहून शर्मिष्ठाला तिच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण झाल्याचं ती या पोस्टमध्ये म्हणतेय. शर्मिष्ठा लिहीते की, "माझं पाडवा गिफ्ट.. खूप वर्षांनी टू व्हिलर चालवणार मी.. कॉलेजच्या दिवसांची पुन्हा आठवण झाली. धन्यवाद तेजस या भेटवस्तूसाठी."

ही भेटवस्तू पाहून शर्मिष्ठाच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोंमध्ये झळकतोय. हे गिफ्ट मिळाल्याने ती प्रचंड आनंदी झालीय. तेव्हा लवकरच या स्कूटरवर शर्मिष्ठाची सवारी पाहायला मिळेल यात शंका नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive