‘टेक केअर गुड नाईट’चा उलगडला टिझर

By  
on  

टेक केअर गुड नाईट हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टिझर नुकताच उलगडण्यात आला. गिरीश जोशी दिग्दर्शित या सिनेमात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्ण पेठे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहेत.

https://youtu.be/YqE7OlD5-IY

आज ऑनलाईनचे युग आहे. सर्व सुख आपल्या पायाशी एका क्लिकवर लोळण घेतात. पण या ऑनलाईन व्यवहारांचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही भरपूर हेत. त्यामुळे आपल्याला हे व्यवहार करताना नेहमी जागरुक राहावे लागते, एका कुटूंबाने सायबर गुन्ह्याविरोधात उठवलेला आवाज आणि त्याच्या केलेला यशस्वी सामना याची ही कथा आहे. वडिलांचे आजच्या जगाशी जुळवून घेताना तंत्रज्ञानाशी हात मिळवणे तर मुलीचे तंत्रज्ञानामुळे कुटुंबाशी संवांद हरवून बसणे हे चित्र सिनेमात रेखाटण्यात आले आहे. गिरीश जोशी यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे.

हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांची निर्मिती असलेला टेक केअर गुड नाईट हा सिनेमा येत्या 31 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित  होत आहे.

 

 

Recommended

Loading...
Share