By  
on  

पाहा Photos : तेजस्विनी पंडितच्या या लूुकने वेधलं लक्ष, शेयर केलं खास फोटोशुट

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय नसली तरी अधूनमधून चाहत्यांसाठी तिच्या काही खास पोस्ट पाहायला मिळतात. अशीच खसा पोस्ट तेजस्विनीने शेयर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवीन फोटोशुट शेयर केलय.

या फोटोशुटमध्ये तेजस्विनीचा खास लूक पाहायला मिळतोय. मोकळे केस, काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस अशा लूकमध्ये तेजस्विनीचं सौंदर्य खुलून दिसतय. 

या फोटोंना सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातय. तर मोठ्या प्रमाणात कॉमेंट्सही मिळाल्या आहेत. 

तेजस्विनीने आत्तापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलय. कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या तेजस्विनीने आता निर्मिती क्षेत्रातही उडी घेतलीय. क्रिएटीव्ह वाईब्स या प्रोडक्शन कंपनीची तिने सुरुवात केलीय. आगामी काळात या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत एक वेब शो देखील ती घेऊन येणार आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive