पाहा Photos : अमृता खानविलकरने साजरा केला खास मैत्रिणीचा वाढदिवस

By  
on  

नुकताच अभिनेत्री सोनाली खरेचा वाढदिवस पार पडला. यावेळी सोशल मिडीयावर सोनालीला वाढदिवसानिमित्ताने अनेकांकडून शुभेच्छा मिळाल्या. मात्र या वाढदिवसाला तिच्या खास मैत्रिणीने तिला सरप्राईज दिलं. रात्री सोनाली झोपली असताना तिच्या या खास मैत्रिणीने केक आणून तिचा वाढदिवस साजरा केलाय. ही खास मैत्रिण म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर. अमृताने सोनालीच्या वाढदिवसासाठी रात्री केक आणून तिला खास सरप्राईज दिलय. अमृता आणि सोनाली या अनेक वर्षांपासून घट्ट मैत्रिणी आहेत. 

त्यामुळे दोघी एकमेकींचे वाढदिवस हे थाटात साजरा करतात. एकमेकिंना सरप्राईज देऊन आणि खास सेलिब्रेशन करून वाढदिवस साजरा करण्यात येतो. यंदाही सोनालीने तिचा वाढदिवस अमृतासोबत साजरा केलाय. 

या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. ज्यात सोनाली अमृतासोबत तिचा वाढदिवस साजरा करताना दिसतेय. 

Recommended

Loading...
Share