By  
on  

ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह लवकरच करणार लग्न ? ऋताने लिहीलं #18daystogo

अभिनेत्री ऋता दुर्गुळेने विविध मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि ती प्रेक्षकांची आवडती बनली. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातूनही तिनं नाट्यरसिकांची मनं जिंकली. मात्र एका व्यक्तिने ऋताचं मन जिंकलय आणि ती व्यक्ति म्हणजे तिचा प्रियकर प्रतीक शाह. काही दिवसांपूर्वी ऋताने प्रतीकसोबतच्या नात्याचा खुलासा करत त्यांचा फोटो शेयर केला. 

सोशल मिडीयावर ऋता आणि प्रतीक या कपलची जोरदार चर्चा सुरु असतानाच ऋताची आणखी एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये ऋताने काहीतरी वेगळं सुचीत केल्याचं दिसतय. #18daystogo म्हणजेच 18 दिवस बाकी असं या पोस्टमध्ये तिने नमुद केलय. 

आता नेमके हे 18 दिवस कशासाठी ? ऋता साखरपुडा करतेय की लग्न करतेय ? असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडलाय. त्यामुळे लवकरच ऋता आणि प्रतीक लग्न करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तेव्हा नेमके हे 18 दिवस कशासाठी हे कदाचीत 18 दिवसांनंतर कळेलच. मात्र ऋताच्या चाहत्यांना तिची प्रतीकसोबतची जोडी प्रचंड आवडल्याचं सोशल मिडीयावर पाहायला मिळतय.

प्रतीक हा हिंदी मालिकांचं दिग्दर्शन करत असून त्याने आत्तापर्यंत गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शन केलय. शिवाय तो अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. ऋताने देखील मुग्धा यांच्यासोबत याआधी काम केलय. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive