सैराट फेम रिंंकू राजगुरुला सुरुवातीला आर्ची म्हणून ओळख मिळाली होती. त्यानंतर विविध सिनेमा, सिरीजमधून रिंकू झळकली आणि ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केलं. सैराटनंतरही रिंकूच्या कामाचं कायम कौतुक होत गेलं. सोशल मिडीयावरही तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
आगामी काळात रिंकू विविध प्रोजेक्ट्स मधून समोर येणार आहे. यातच रिंकूच्या नव्या सोशल मिडीयावर पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
रिंकूने ट्रेडिशनल लुकमधील काही फोटो शेयर केले आहेत. यात रिंकूने गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून ती दागदागिने घालून नटली आहे. लांब केसांची वेणी आणि त्यात गजरा असा तिचा हा लुक आहे. रिंकूच्या या लुकने सगळ्यांचच लक्ष वेधलय. सोशल मिडीयावर या लुकमधील फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे.
याशिवाय रिंकूने या फोटोसाठी लिहीलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेणारं आहे. रिंकूने लिहीलय की लवकरच काहीतरी नवीन घेऊन ती येत आहे. तेव्हा हा लुक तिच्या आगामी सिनेमासाठी तर नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
आगामी काळात 'छुमंतर', 'आठवा रंग प्रेमाचा' यांसारख्या सिनेमांमध्ये रिंकू झळकणार आहे. याशिवाय काही सिनेमांसह रिंकू विविध वेबसिरीजमध्येही झळकली आहे. '200 हल्ला बोल' या सिनेमातूनही रिंकूने प्रेक्षकांची मनं जिंकली.