By  
on  

ब्युटी इन ब्लॅक ! अभिनेत्री प्रिया बापटचा बोल्ड आणि ब्युटिफुल लुक

अभिनेत्री प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री. मराठीसोबतच हिंदीतही प्रियाच्या अभिनयाची चमक पाहायला मिळते. विविध वेबसिरीजमधूनही प्रिया आपल्या सशक्त अभिनयाची छाप पाडते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी प्रिया किती फिटनेस फ्रिक आहे, हे तुम्हाला चांगलंच माहितीय. नेहमीच विविध आऊट्फिट्समधले लुक कॅरी करायला प्रियाला खुप आवडतं. मग साडी असो किंवा वेस्टर्न ड्रेस प्रिया अगदी खासच दिसते. 

एका अवॉर्ड सोहळ्यात प्रियाचा बोल्ड आणि स्टनिंग लुक नुकताच पाहायला मिळाला, 

या ग्लिटरी ब्लॅक ड्रेसमध्ये प्रियाचा घायाळ करणारा लुक चाहत्यांना क्लिन बोल्ड करतो आहे. 

चाहत्यांनी प्रियाच्या या ब्युटी इन ब्लॅक लुकवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 

प्रिया लवकरच हिंदी सिनेमात झळकणार आहे. विस्फोट असं तिच्या बॉलिवूडपटाचं नाव असून अभिनेता रितेश देशमुखसोबत प्रिया स्क्रिन शेयर करते. टीसिरीज या सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळतेय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive