By  
on  

पाहा Video : अश्विनी भावे यांनी अशी केलीय ख्रिसमसची तयारी

सगळीकडे सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. ख्रिसमसची शॉपिंग करणं, ख्रिसमस ट्री सजवणं या सगळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच अभिनेत्री अश्विनी भावे यांचा उत्साहही पाहायला मिळतोय. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी या प्रत्येक सण, उत्सव उत्साहात साजरा करताना दिसतात. ख्रिसमससाठीही दरवर्षी जोरदार तयारी असते.

यावर्षीसाठीही अश्विनी यांनी ख्रिसमसची तयारी केली आहे. त्यांनी सुंदर ख्रिसमस ट्री सजवलाय. त्याचा व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. अश्विनी भावेंसह घरातील सर्व मंडळी ख्रिसमसच्या तयारीला लागलेले दिसत आहेत.

 

अश्विनी भावे यांनी नुकताच सोशल मिडीयावर ख्रिसमस ट्री सजवतानाचा व्हिडीओ शेयर करत ख्रिसमस म्हणजेच नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोशल मिडीयावर अश्विनी या विविध पोस्ट शेयर करताना दिसतात. अमेरिकेतील राहत्या घरी त्या कुकिंग, झाडे लावणे हे सगळे विविध छंद त्या जोपासतात. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही आवर्जुन सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसतात.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive