BBM3 Grand finale : 5 लाखांची बॅग घेऊन शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या घरात

By  
on  

बिग बॉस मराठी सिझन 3 चा ग्रँड फिनाले सोहळा आज पार पडतोय. यंदाच्या सिझनचा विजेता कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना टॉप 5 स्पर्धकांपैकी कुणाच्या हाती बिग बॉस मराठी 3 ची टॉफ्री असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

यातच टॉप 5 स्पर्धकांना फिनालेला एक टास्क मिळणार आहे. या टास्कसाठी बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे.

यावेळी शिवच्या हातात पाच लाखांची ब्रिफकेस असेल. तेव्हा हे पाच लाख कोण घेऊन जाणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

Recommended

Loading...
Share