By  
on  

येळकोट येळकोट जय मल्हार : या मराठी अभिनेत्रीने पु्न्हा उचलली खंडेरायांची ४२ किलोची तलवार

स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारुन अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. या ऐतिहासिक मालिकेतील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. 

प्राजक्ता सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. सोशल मिडीयावर तिचे काही फोटो चर्चेत आहेत. 

 

प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं.

जेजुरी गडावरचे हे सुंदर फोटो प्राजक्ताने शेयर केले. 

यावेळी तिने गडावरचा भंडारासुध्दा उधळला. 

महत्त्वाचं म्हणजे प्राजक्ताने खंडेरायाची ४२ किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive