By  
on  

"माझं भाग्य की मला त्यांचे आशिर्वाद मिळाले" म्हणत अभिनेता संदीप पाठकने सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली

अनाथांच्या माय म्हणून ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं नुकतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालय. अनेकांना या बातमीने मोठा धक्का बसलाय. ज्या ज्या व्यक्तिंना त्या भेटल्या त्यांना सिंधुताईंकडून कायम मोलाचा, प्रेमाचा सल्ला आणि आशिर्वाद मिळाले आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेता संदीप पाठक. सिंधुताईंच्या निधनाची बातमी कळताच संदीपलाही धक्का बसलाय. त्यानंतर हे दु:ख सावरत त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करुन सिंधुताईंसोबतची खास आठवण सांगितली आहे.

संदीपने सिंधुताईंसोबत फोटो शेयर केलाय. त्याने लिहीलय की, " सिंधुताई च्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला, मन सुन्न झालं,काही दिवसांपूर्वीच माईंची भेट झाली होती. वऱ्हाड चा संपूर्ण प्रयोग त्यांनी बघितला आणि शाबासकी दिली. इतकी सकारात्मक , हसतमुख, जगण्यात प्रचंड उर्जा असणारी व्यक्ती मी बघितली नाही.माझं भाग्य की मला त्यांचे आशिर्वाद मिळाले. त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या महान कार्याने त्या आपल्याला सतत प्रेरणा देत राहतील. 'पोरक्यांना आपलसं करणाऱ्या माई गेल्या अन् महाराष्ट्र पोरका झाला' शांती लाभो."

एकाच भेटीत आपलसं करणाऱ्या सिंधुताई यांच्या निधनाने अनाथांची माय गेल्यानं महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सिंधुताई सपकाळ यांची ख्याती होती. यासाठी आत्तापर्यंत सिंधुताईंवर विविध पुरस्कारांचा वर्षाव झालाय. 2021 मध्ये सिंधुताईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive