By  
on  

Video : लतादीदींनी कॉन्सर्टमध्ये गायलं होतं हे इंग्रजी गाणं, गायक महेश काळेंनी दिली माहिती

भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारही करण्यात आले.  मोठ्या जड अंत:करणाने दीदींना चाहत्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचा सुरेल स्वर अजरामर राहील, हे मात्र नक्की.

सूर पोरका झाला असला तरी या सुरेल स्वरांच्या आठवणी हदयात कायम आहेत. लतादीदींविषयी जितकं लिहू तितकं कमी. प्रसिध्द शास्त्रीय गायक महेश काळे यांनी लतादीदींविषयीची एक अल्पपरिचित असलेली माहिती सोशल मिडीयावरुन चाहत्यांना दिली आहे. ते म्हणतात, तुम्हाला हे माहितीय का 1985 रोजी कॅनडा येथे झालेल्या कॉन्सर्टमध्ये लतादीदींनी यू नीडेड मी ...हे इंग्रजी गाणं गाऊन श्रोत्यांवर जादू केली होती. त्यावेळेस त्या 55 वर्षांच्या होत्या. त्यांची कारकिर्द ऐन भरात होती. तरीही नवीन काही शिकायला कुठला प्रयोग करायला त्या मागेपुढे पाहत नसत. त्या नेहमीच नव्याची कास धरायच्या म्हणूनच त्या गानसम्राज्ञी होत्या. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Kale (@maheshmkale)

 

लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Kale (@maheshmkale)

 

गायक महेश काळे यांनी लतादीदींविषयीची खुप महत्त्वपूर्ण आणि रंजक माहिती चाहत्यांना दिली. 28 सप्टेंबरला दीदींचा वाढदिवस होता. त्यावेळस त्यांच्यासोबतचा फोटो शेयर करत महेश यांनी आठवणींना उजाळा दिला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Kale (@maheshmkale)

 

 

लतादीदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. रविवारी ६ फेब्रुवारी रोजी   लतादीदींवर मुंबईतील दादर परिसरात असलेल्याशिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive