By  
on  

नागराज मंजुळे ऑस्कर आणेल याची खात्री आहे, असं म्हणत वैभव मांगलेने केलं कौतुक

 सध्या सैराट दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर झुंड या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वीच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या सिनेमाचं प्रायव्हेट स्क्रिनींग नुकतंच पार पडल आणि हा सिनेमा पाहून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुध्दा भारावून गेला.यानंतर मराठी सिनेसृश्टीतूनही नागराज यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

अभिनेते वैभव मांगले यांनी देखील पोस्ट लिहित नागराज मंजुळे आणि ‘झुंड’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. ‘मी कालच एक गोष्ट बोललो... कुणाला पटेल न पटेल... घाई करतोय असं वाटेल.... पण नागराज ऑस्कर आणेल, याची पूर्ण खात्री आहे. कारण ज्या कलेत मातीच सत्व असतं ती मोठी कला. नागराजकडे ते आहे. झुंडसाठी खूप खूप प्रेम आणि शुभेच्छा!!’ अशी पोस्ट वैभव मांगले यांनी लिहिली आहे.

 

नागराज मंजुळे ऑस्कर आणेल याची खात्री आहे, असं म्हणत त्यांनी कौतुक केलं आहे.

‘झुंड’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच ‘सैराट’ फेम आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या कलाकारांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘झुंड’ हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे निवृत्त क्रीडा शिक्षक विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारतायत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive